Karnataka : सध्या बेळगाव महापालिका निवडणूक झाल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी बेळगावकरांना महापौर-उपमहापौर मिळाला आहे. यामध्ये मात्र नवीन नाव समोर आली आहेत. यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर आणि उपमहापौरपदी मराठी भाषिक महिलांची निवड झाली आहे.
दोन्ही राज्यांमध्ये सीमावादावरुन मोठा संघर्ष बघायला मिळाला. तेव्हा महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून वेगवेगळी वक्तव्य करण्यात आली होती.

यामुळे बेळगावातील मराठी जनता आणि महाराष्ट्रातील जनता नाराज झाली. यामुळे भाजपने बेळगावात महापौर आणि उपमहापौरपदी मराठी माणूस बसवला आहे की काय? अशी चर्चा आता सुरु झाली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यामध्ये लक्ष घातले आहे. दरम्यान, या निवडीमध्ये मराठी भाषिकांना बेळगावमध्ये कन्नडी संघटनांकडून प्रचंड विरोध केला जातो. पण यावेळी भाजपने कन्नडींचा विरोध झुगारुन मराठी भाषिकांचा विचार केला आहे.
दरम्यान, महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी अनगोळ येथील मराठा नगरसेविका शोभा सोमनाचे तर शाहूनगरच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांनी नामांकन दाखल केले होते. त्यामुळे शोभा सोमनाचे यांची बेळगाव महापौरपदी निवड झाली.