Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात होती.
तसेच भाजपकडून ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. मात्र, जितेंद्र आव्हाड हे आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ते म्हणाले, काहीही झालं तरीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून माघार घेणार नाही.

मी काहीही चुकीचं बोललो नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. ते म्हणाले, एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार.
मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? दरम्यान, समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.
दरम्यान, भाजपकडून यानंतर आंदोलन केली गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्युत्तर म्हणून आंदोलन केली आहेत. मी जे बोललो ते 2 हजार टक्के वादग्रस्त बोललो नाही, असेही ते म्हणाले. यामुळे आता वाद मिटणार की वाढणार हे लवकरच समजेल.