Alert : पूर्वी शाळा, कॉलेज किंवा अनेकांच्या घरी तुम्ही संगणक पाहिला असेल. आता याच संगणकाची जागा लॅपटॉपने घेतली आहे. अनेकजण आता मोठ्या प्रमाणात लॅपटॉप वापरत आहेत. जर तुम्हीही लॅपटॉप वापरत असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे.
कारण लॅपटॉप वापरत असताना तो काळजीपूर्व वापरणे गरजेचा आहे. अनेकांना वापर करत असताना त्याच्या सुरक्षिततेबद्दल माहिती नसते. जर तुम्हीही लॅपटॉपची सुरक्षितता जाणून घेता वापरत असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुमचा लॅपटॉप हॅक होईल.

करू नका या चुका
क्रमांक १
लॅपटॉप वापरत असताना Google वरील कोणत्याही वेबसाइटला भेट देऊन परवानगी देऊ नका. अनेकजण कोणताही विचार न करता कोणत्याही वेबसाइटला परवानगी देतात. बनावट वेबसाइटला परवानगी मिळाली तर, ते तुमचा लॅपटॉप देखील हॅक करू शकतात. त्यामुळे नेहमी फक्त विश्वसनीय वेबसाइटनाच परवानगी द्या.
क्रमांक २
जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर तुम्हाला ईमेल, व्हॉट्सअॅप किंवा इतर माध्यमातून अज्ञात लिंक्स मिळाल्या असतील. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की अशा लिंकवर चुकूनही क्लिक करू नका,जर तुम्ही असे करत असाल तर तुमचा लॅपटॉप हॅक होऊ शकतो. त्यामुळे असे इमेल्स लगेच डिलीट करा.
क्रमांक ३
अनेकजण लॅपटॉप वापरत असताना ही चूक करतात की ते लॉटरी किंवा ऑफर असलेले ईमेल लगेच उघडून त्या लिंकला भेट देतात. तुम्ही असे कधीही करू नका, नाहीतर तुमचा लॅपटॉप हॅक होईल. कोणत्याही वेबसाईटला भेट देण्याअगोदर त्याबद्दल जाणून घ्या.
क्रमांक ४
अनेकजण त्यांच्या लॅपटॉपवर त्यांचे नेट बँकिंग येथे लॉग इन करतात. अनेकजण आयडी आणि पासवर्ड ब्राउझरवर सेव्ह करून मोठी चूक करतात. तुम्ही असे करू नका.