Vivo 5G Phone Offers : विवोच्या 5G फोनवर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर! जाणून घ्या किंमत

Published on -

Vivo 5G Phone Offers : दिग्ग्ज टेक कंपनी विवो आपले सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. नुकताच कंपनीने आपला Vivo V25 Pro 5G हा फोन लाँच केला होता. आता याच फोनवर सर्वात मोठी सवलत मिळत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 39,999 रुपये इतकी आहे.

परंतु, सवलतींमुळे तुम्ही तो 35,999 रुपयांना विकत घेऊ शकता. तसेच कंपनीच्या या फोनवर इतर ऑफर मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे लवकरात लवकर स्वस्तात मस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन विकत घ्या.

जाणून घ्या Vivo V25 Pro 5G चे फीचर आणि स्पेसिफिकेशन

कंपनी आपल्या Vivo V25 Pro 5G मध्ये 2376×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.56-इंचाचा फुल HD+ 3D वक्र डिस्प्ले देत असून तो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. तसेच कंपनी प्रोसेसर म्हणून यामध्ये MediaTek Dimensity 1300 चिपसेट देत आहे. या फोनच्या मागच्या बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत.

तसेच यात 8-मेगापिक्सेल वाइड अँगल आणि 64-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स उपलब्ध आहे. तर कंपनीकडून सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येत आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4830mAh बॅटरी दिली आहे जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 वर आधारित FuntouchOS 12 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत. फोनमध्ये दिलेला हा टाइप-सी पोर्ट ऑडिओ आउटपुट पोर्ट म्हणूनही वापरला जाऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News