Balasaheb thorat : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज अचानकपणे राजीनामा दिला. पदवीधर निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरू होता. असे असताना आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची कारण समोर आली आहेत.
थोरात म्हणाले, सत्यजीतसाठी मी दिल्लीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो. सत्यजीतला पाठिंबा देण्यास सर्वांची तयारी होती. मात्र अचानक शेवटच्या दिवसांत राजकारण झाले. सगळं ठरलं होतं मात्र शेवटी सगळं बदलले.

मला अंधारात ठेवून सगळं केलं गेलं, सत्यजीत तांबे माझ्या घरातले आहेत. राजकारणात नाते जपणं अत्यंत महत्त्वाचे असते. नाराजीचे पत्र लिहिल्यावर मला दिल्लीतून फोन आले. माझ्या नाराजीबद्दल दिल्लीतून विचारणा केली गेली, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती. नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवार देयची यावरून हा वाद सुरू झाला होता.
असे असताना आता थोरात त्यांनी थेट विधिमंडळ पक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या राजीनाम्यावर हायकमांड काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. मात्र काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का आहे. यामुळे काँग्रेसमध्ये फेरबदल देखील होण्याची शक्यता आहे.