Kasaba By Election : भाजपाच्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा जागेवर आता पोट निवडणूक होत आहे. यासाठी आता सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. तसेच अनेकजण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कसब्याची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु असताना बिचकुलेंनी एन्ट्री केली आहे. असे असताना आज त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. काल बिग बाँस फ्रेम अभिजित बिचकुले यांनीही अर्ज दाखल केला आहे.

तसेच भाजपकडून हेमंत रासने, तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांनी अर्ज भरला आहे. दरम्यान उमेदवारी मागे घेण्यासाठी बिचकुले यांना धमकी देण्यात आली आहे. बिचकुले यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान ते म्हणाले, मी कसबा पेठेत राहतो. येथील प्रश्न देखील माझे आहेत.
जो पर्यंत मी विधानसभा संसदेमध्ये जात नाही, तोपर्यंत निवडणूक लढणार’ असे त्यांनी काल सांगितले आहे. यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात अभिजित बिचुकले उभे राहिले होते.
दरम्यान, राजकारणासोबतच बिग बॉस मराठी, हिंदी मध्येही बिचुकले यांनी एन्ट्री घेत धमाल उडवून दिली होती. यामुळे ते नेहेमी चर्चेत असतात. अनेक निवडणूका लढून देखील त्यांना अजून विजय मिळवला आला नाही.