Steel and Cement Price : बांधकाम क्षेत्रात सध्या मंदी सुरु असल्याने घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य स्वस्त होत आहे. मात्र लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. या दिवसांमध्ये बांधकाम क्षेत्रात तेजी येते त्यामुळे साहित्य महागण्याची शक्यता आहे.
जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घर बांधायचे असेल तर तुमच्यासाठी आताच संधी आहे. कारण थोड्याच दिवसांत स्टील आणि सिमेंटच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जर तुम्ही घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आताच खरेदी केल्या नाहीत तर तुम्हाला नंतर त्या महाग मिळू शकतात. कारण स्टील आणि सिमेंटचे दर उतरले आहेत.
सध्या तीळ आणि सिमेंटचे दर सामान्य आहेत. कमी बजेटमध्येही तुमचे घर पूर्ण होऊ शकते. स्टील आणि सिमेंट खरेदी करताना तुमच्या खिशावर सध्याच्या दराने जास्त आर्थिक बोजा पडणार नाही.
स्टीलची किंमत
पक्के घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट हे दोन महत्वाचे घटक आहेत. मात्र यांच्या किमती वाढत असल्याने अनेकांना घर बांधणे कठीण होत आहे. सध्याच्या स्थितीत तुम्ही घर बांधत असाल तर तुम्हाला स्टील आणि सिमेंट स्वस्त दारात मिळू शकते.
10 ते 25 MM स्टील 100 KG- 65000 रुपये
8 ते 32 MM स्टील 100 KG- 66500 रुपये
6 MM स्टील 100KG- 66500 रुपये
सिमेंटच्या किमती
बिर्ला सिमेंटच्या दरात २० रुपयांनी घट झाली आहे. सध्या 340 रुपये प्रति बॅग दराने बिर्ला सिमेंट उपलब्ध आहे. याशिवाय ACC सिमेंट 365 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सिमेंटच्या दरात काहीशी घट झाली आहे.