Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा जानेवारीतला मुहूर्त हुकलाय; यावेळी पण मुहूर्ताची तारीख बदलणार काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात आहे. मात्र आता 10 फेब्रुवारी रोजी मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. वंदे भारत ट्रेनच्या चाचण्या देखील अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

मात्र अशातच मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा ज्या पद्धतीने जानेवारी महिन्यातला मुहूर्त हुकला होता त्या पद्धतीने या महिन्यात तर महूर्त चुकणार नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरं पाहता, जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आयोजित झाला होता. त्यावेळी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवण्याचे नियोजन मध्य रेल्वे विभागाने हाती घेतले होते.

पण रेल्वेचे हे नियोजन त्यावेळी शक्य झाले नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा न दाखवताच परतले होते. यामुळे आता 10 फेब्रुवारी रोजी फिक्स वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन होणार का हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार आणि रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी मुहूर्त चुकण्याच काही कारणच नाही. मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या यावेळी पार पाडल्या गेल्या आहेत.

यामुळे 10 फेब्रुवारी रोजी मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी या दोन वंदे भारत महाराष्ट्राला मिळणार आहेत हे शंभर टक्के फिक्स झाल आहे. निश्चितच या दोन वंदे भारत ट्रेनमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणाहून सोलापूर आणि शिर्डी या दोन शहरादरम्यानचा प्रवास सोयीस्कर होणार आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर वासियांची वंदे भारत ट्रेनचीं मनोकामना आता पूर्ण होणार आहे.

दरम्यान ही ट्रेन पुणे मार्गे धावणार असल्याने पुणेकरांना देखील याचा फायदा होणार आहे. शिवाय जी दुसरी मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन आहे या ट्रेनमुळे मुंबईहून साईदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचीं मोठी सोय होणार आहे. दरम्यान या ट्रेनच्या रूट बाबत आणि तिकीट दराबाबत जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अधिक माहिती आपण जाणून घेऊ शकता.

बातमी कामाची ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस विषयी ए टू झेड माहिती, पहा…..