State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि सुनी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ग्रॅच्यूटीची रक्कम दिली जात असते. नवीन पेन्शन योजनेत मात्र ग्रॅच्यूटीची रक्कम मिळत नाहीये. तथापि, आता शिंदे सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.
ज्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे त्यांना सुधारित पेन्शन योजना निवडण्याचा विकल्प दिला जाणार आहे. मात्र, या सुधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय अजूनही निघालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे.
पण काही मीडिया रिपोर्ट मध्ये लोकसभा निवडणूका झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच सुधारित पेन्शन योजनेचा जीआर जारी केला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येईल असा दावा केला जात आहे.
अर्थातच नजीकच्या भविष्यात राज्यातील जुनी पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांना आणि सुधारित पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर ग्रॅच्यूटीची रक्कम मिळू शकणार आहे.
दरम्यान, आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर ग्रॅज्युएटीची किती रक्कम मिळते, हे कसे चेक करायचे ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्य कर्मचाऱ्यांना किती ग्रॅच्यूटी मिळू शकते
२०१६ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, राज्य कर्मचाऱ्यांना कमाल 14 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युइटी मिळू शकते. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना 14 लाख रुपयांपेक्षा जास्तीची उपदानाची रक्कम मिळू शकत नाही.
आता आपण राज्य कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम मोजण्यासाठी कोणता फॉर्मुला वापरला जातो याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ग्रॅज्युएटीची रक्कम मोजण्यासाठी एक विशिष्ट फॉर्म्युला वापरला जातो.
कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन X ( सेवाकाळ X 2 ) / 4 हा फॉर्मुला उपदानाची रक्कम मोजण्यासाठी वापरला जातो. आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीची किती रक्कम मिळू शकते ? याबाबत एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
समजा जर एखाद्या कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन हे 50,000 रुपये आहे आणि त्याची सेवा 20 वर्षे झाली असल्यास त्यास मिळणारे ग्रॅज्युएटीची रक्कम = 50,000 X ( 20 X 2 ) / 4 = 500,000/- म्हणजेच या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर 5 लाख रुपये एवढी रक्कम ग्रॅच्युईटी म्हणून दिली जाणार आहे.