Laptop Tips : शाळकरी विद्यार्थी असो किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी असो. तुम्हाला आता प्रत्येकाकडे लॅपटॉप पाहायला मिळेल. सध्या लॅपटॉपची गरज आणि मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक दिग्ग्ज कंपन्या आपल्या लॅपटॉपमध्ये शानदार फीचर्स देऊन नवनवीन लॅपटॉप लाँच करत आहे.
त्यामुळे मार्केटमध्ये लॅपटॉपची किंमत जास्त झाली आहे. अनेकजण हजारो रुपये खर्च करून लॅपटॉप खरेदी करत आहे. परंतु, लॅपटॉप घेतल्यानंतर काही चुका टाळाव्यात. नाहीतर तुमचा महागडा लॅपटॉप लवकर खराब होऊ शकतो.

तुम्हीही लॅपटॉप घेण्यासाठी हजारो रुपये मोजले असतीलच. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लॅपटॉप वेळेपूर्वी खराब होऊ नये असे वाटत असेल, तर त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या काही चुकांमुळे लॅपटॉप वेळेपूर्वी जुना आणि खराब होतो.
जास्त वेळ गेम खेळणे टाळा
जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर जास्त गेम खेळत असाल तर तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. कारण अनेक लॅपटॉप गेमिंगला सपोर्ट करू शकत नाहीत तसेच त्याविषयी आपल्याला जास्त माहिती नसते. जर तुम्हाला गेम खेळण्यासाठी लॅपटॉप वापरायचा असेल तर तुम्ही यासाठी गेमिंग लॅपटॉप विकत घेऊ शकता.
मूळ चार्जरने लॅपटॉप चार्ज करा
हे लक्षात ठेवा की लॅपटॉप नेहमी त्याच्या मूळ चार्जरने चार्ज करा. लॅपटॉपसाठी कोणत्याही चार्जरने चार्ज केला तर त्याचा लॅपटॉपच्या बॅटरीवर वाईट परिणाम होऊन तो लवकर खराब होतो.
जास्त टॅब वापरणे टाळा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे लॅपटॉपवर चारपेक्षा जास्त टॅब उघडू नका. जर जास्त टॅब उघडल्या तर लॅपटॉप वापरल्याने प्रक्रियेवर दबाव येऊन लॅपटॉप लवकर खराब होतो.