Alert : सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियामुळे जग जरी जवळ आले असले तरी फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियाचे काही नियम असतात. अनेकांना हे नियम माहित नसतात.
त्यामुळे त्यांच्याकडून नकळत गुन्हा होतो. जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर तुम्हाला त्याच्या नियमांबद्दल माहिती असावी. जर तुम्ही नियमांचे उल्लंघन केले तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसेच तुम्हाला तुरुंगातही जावे लागेल.

चाइल्ड पोर्नोग्राफी
हे लक्षात घ्या की सोशल मीडियावरील चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत कायदा खूप कडक आहे. सोशल मीडियावर स्क्रोल करताना चाइल्ड पोर्नोग्राफीशी निगडित व्हिडिओ सापडला तर अडचणीत याल.
त्यामुळे असे व्हिडिओ पाहू नये. तसेच या संदर्भात कोणतीही माहिती शोधू नये. कारण हा कायदेशीर गुन्हा असून जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका
सध्या खोट्या बातम्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. सरकार खोट्या बातम्या थांबवण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल आणि जर एखादी खोटी बातमी तुमच्या समोर आली तर ती शेअर करू नये.
समजा तुम्ही कोणतीही खोटी बातमी शेअर केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी, ती तपासा.
आक्षेपार्ह व्हिडिओ
चुकूनही गुन्ह्याच्या श्रेणीत येणारा आक्षेपार्ह असा कोणताही व्हिडिओ शेअर करू नका. असे व्हिडिओ शेअर करणे बेकायदेशीर असून या व्हिडिओंमुळे समाजात द्वेष आणि परस्पर भेदभावाची भावना वाढते.