Pradnya Satav : मोठी बातमी! काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला

Published on -

Pradnya Satav : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीत हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असं प्रज्ञा सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्या सध्या सुरक्षित आहेत.

त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर असताना माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कुणाचेही वाईट केलेले नाही.

महिला आमदारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी, मी माझ्या लोकांसाठी काम करणार. कारण राजीव भाऊंचे आशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांच्यासारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले आहेत.

त्यांनी घरी न बसता आपले काम सुरु ठेवले. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असेही त्यांनी म्हटले आहे. त्या काँग्रेसच्या विधानपरिषदेतील आमदार आहेत, प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत.

काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली होती. विधान परिषद पोटनिवडणुकीत त्यांची निवड बिनविरोध झाली होती. सध्या या हल्ल्याची चौकशी पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe