E Shram Card Balance Check : ई श्रम कार्ड धारकांसाठी खुशखबर! सरकारने खात्यात जमा केले 1000 रुपये, अशी तपासा खात्यातील शिल्लक रक्कम

Ahilyanagarlive24 office
Published:

E Shram Card Balance Check : केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहेत. त्याचा देशातील लाखो गरीब नागरिकांना फायदा होत आहे. केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरु केली आहे.

ई श्रम कार्ड योजनेद्वारे केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून करोडो असंघटित क्षेत्रातील मजुरांना आर्थिक मदत दिली जाते. जर तुम्हीही असंघटित कामगार असाल तर तुम्हीही लेबर कार्ड पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकता.

सरकारच्या या योजनेद्वारे लाखो असंघटित कामगारांना आर्थिक सहाय्य आणि रोजगाराच्या नवीन संधी देखील प्रदान करते. सरकारकडून दरमहा 1000 रुपयांची आर्थिक मदत ई श्रम कार्डधारकांना कामगारांच्या बँक खात्यात पाठवली जाते.

सरकारकडून असंघटित कामगारांच्या खात्यावर १००० रुपयांचा हफ्ता पाठवण्यात आला आहे. जर तुम्हाला तुमच्या खात्याची रक्कम तासाची असेल तर अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाच्या मदतीने पाहू शकता.

ई श्रम कार्ड योजना

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रमिक योजना योजना सुरु केली आहे. 16 ते 59 वर्षे वयोगटातील सर्व कामगार ई-श्रमिक योजनेचा फायदा घेऊ शकतात. असंघटित कामगारांना एकत्र जोडून त्यांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा या योजनेमागचा उद्देश आहे.

ई श्रम कार्ड बॅलन्स कसा पाहायचा?

लेबर कार्ड शिल्लक तपासण्यासाठी, सर्वप्रथम Eshram.Gov.In अधिकृत वेबसाइटला भेट द्या

होम पेजवर उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये ई श्रम कार्ड बॅलन्स चेक 2023 पर्यायावर जा.

एक नवीन लॉगिन पृष्ठ प्रदर्शित केले जाईल ज्यामध्ये आधार क्रमांक, मोबाइल नंबर इत्यादी तपशील प्रविष्ट करा.

माहिती सबमिट केल्यानंतर सबमिट करा.

लेबर कार्ड पेमेंट स्टेटस उपलब्ध असेल, ज्याच्या आधारावर तुम्हाला रक्कम मिळू शकेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe