BJP MLA : मोठी बातमी! मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी, भाजप आमदारांना आली शंका, आणि…

Published on -

BJP MLA : राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. असे असताना पहिल्या विस्तारापूर्वी आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली १०० कोटींची मागणी केली होती. मात्र, काही आमदारांना याबाबतची शंका आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे पुढे आले होते. यामध्ये आमदारांना नव्हे, तर कॅबिनेट मंत्र्यालाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.

भाजप आमदारांबाबत ही घटना घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी नुकतेच पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी रियाज शेख हा आमदारांना आपण दिल्लीहून आलो आहोत, वरिष्ठ मंत्र्यांनी तुमचा बायोडाटा मागितला आहे, असे सांगत होता.

तसेच आपण दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्याच्या संपर्कात आहोत. मंत्रीपद मिळवून देतो, पण त्यासाठी १०० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी तो आमदारांना करायचा, आरोपींनी एका कॅबनेट मंत्र्यालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता सध्या पुन्हा नाकारता येत नाही. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News