Electric Scooter : बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. पण किंमत जास्त असल्याने अनेकांना ते घेणे शक्य होत नाही. मात्र तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कमी किमतीत जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल झाली आहे.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता आता अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहे. तसेच केंद्र सरकारकडूनही ऑटो क्षेत्रातील कंपन्यांना अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
इलेक्ट्रिक वाहने नुकतीच बाजारात आली असल्याने त्यांच्या किमती अधिक आहेत. मात्र आता अनेक कंपन्यांकडून कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल केल्या जात आहेत.
Ujaas EZY इलेक्ट्रिक स्कूटर
Ujaas EZY इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला सर्वाधिक कमी किमतीमध्ये खरेदी करता येऊ शकते. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 31,880 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये
Ujaas EZY इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 60 किलोमीटरची रेंज देते असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. ही बॅटरी 48v, 26Ah पॉवर बॅटरी आहे. स्कूटरमध्ये 250W हब मोटर बसवण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरला चार्जिंग पॉइंट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, अँटी थेफ्ट अलार्म, डिजिटल ओडोमीटर, कीलेस राइडिंग, रिव्हर्स ड्रायव्हिंग गियर, पास स्विच, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न मिळते. सिग्नल लॅम्पमध्ये कमी बॅटरी इंडिकेटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.