Wheat Price : देशात हिवाळ्यामध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. थंडी गहू पिकासाठी पोषक असल्याने याच दिवसांत गहू पिकवला जातो. सध्या देशातील काही भागात गहू काढणीसाठी तयार झाला आहे तर काही बाजारपेठेत नवीन गहू दाखलही झाला आहे.
नवीन गहू बाजारात दाखल झाला असला तरी गव्हाचे दर वाढतच चालले आहेत. यामागील कारण असे की रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाची मागणी वाढली आहे. गव्हाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.
एका वर्षात गव्हाचे दर 16 टक्क्यांनी वाढले असून आता दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये भाव 3 हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेला आहे. सध्या देशभरात किमान आधारभूत किमतीपेक्षा गहू विकला जात आहे.
गव्हाच्या किमतीमुळे गव्हाच्या पिठाचे दरही वाढले आहेत त्यामुळे अनेकांना वाढत्या दराने गव्हाचे पीठ खरेदी करावे लागत आहे. गेल्या वर्षभरात पिठाच्या किमतीत १६ टक्क्यांनी वाढ झाली असून, आता 35 ते 40 रुपये किलोने गहू विकला जात आहे.
गव्हाचे दर सध्या 4000 रुपये प्रति क्विंटल झाले असते मात्र सरकारकडून ई-निलावाद्वारे गव्हाची विक्री केली जात असल्याने सध्या हे दर आहेत. नवीन गहू बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे दर पुन्हा घसरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेतील गव्हाचे भाव
मुंबई बाजार भाव – 2740 ते 5850 प्रति क्विंटल
नागपूर बाजारपेठ भाव- 2516 ते 2896 प्रति क्विंटल
लातूर बाजारपेठ भाव- 2460 ते 4140 प्रति क्विंटल
नाशिक बाजारपेठ भाव- 2435 ते 3030 प्रति क्विंटल
पुणे बाजारपेठ भाव- 3200 ते 4000 प्रति क्विंटल