PAN Card Holders Update : जर तुम्हीही पॅनकार्ड वापरत असाल तर बातमी काळजीपूर्वक वाचा. जर तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करायचा नसल्यास आजच तुमचे पॅनकार्ड हे तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करा.
जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत आयकर विभागाने सर्व पॅन कार्डधारकांना सतर्क केले आहे. त्यामुळे आजच आपले पॅनकार्ड आधार कार्ड सोबत लिंक करा नाहीतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लगे.

आयटी विभागाने याबाबत एक नोटीस जारी केली आहे की, ‘हे अनिवार्य असून आता उशीर करू नका, आजच पॅन आधारशी लिंक करा! आयटी कायद्यानुसार, सर्व पॅन-धारकांसाठी, जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत, त्यांनी त्यांचा पॅन क्रमांक 31 मार्च 2023 पूर्वी आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. 1 एप्रिल 2023 पासून, लिंक न केलेले पॅन निष्क्रिय होणार आहे.
आता तुम्ही तुमची आधार आणि पॅन लिंकिंग स्थिती ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे सहज तपासू शकता. तुम्हाला तुमचा पॅन आणि आधार लिंक आहे की नाही हे सोप्या पद्धतीने कळेल.
असे करा लिंक
तुम्ही पॅन आणि आधार एसएमएस किंवा ऑनलाइन लिंक करू शकता. जर तुम्ही SMS द्वारे लिंक करत असाल तर तुम्हाला नोंदणीकृत फोन नंबर वापरून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवावा लागेल.
आता आयकर पोर्टलला भेट देऊन तुम्ही लागू विलंब शुल्क भरून ऑनलाइन लिंक करू शकता.
- त्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे: http://incometaxindiaefiling.gov.in
- जर तुम्ही तुमच्या आयडीची नोंदणी आधीच केली नसेल तर ती लगेच करून घ्या.
- तुम्हाला तुमचा यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख वापरून पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. त्यासाठी वापरकर्ता आयडी तुमचा पॅन असेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक पॉप-अप विंडो येईल.
- लिंक करण्यासाठी तुम्हाला मेनूबारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जाऊन होमपेजवर ‘लिंक आधार’ वर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही तुमच्या आधार कार्डवर नमूद केल्याप्रमाणे तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक आणि तुमचे नाव टाका.
- लागू असल्यास, ‘I have only year of birth in Aadhaar card’ या बॉक्सवर क्लिक करा.
- त्यानंतर सत्यापित करण्यासाठी स्क्रीनवर प्रदर्शित कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागणार आहे.
- त्यानंतर ‘Link Aadhaar’ बटणावर क्लिक करा.
- जर तुम्ही प्रविष्ट केलेले तपशील जुळत असतील तर, ‘आता लिंक करा’ बटणावर क्लिक करा. तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी यशस्वीरित्या लिंक केले जाईल.
- सगळ्यात शेवटी तुम्हाला यशस्वी लिंकिंग प्रक्रियेनंतर, तुमचा आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे हे सांगणारा एक पॉप-अप संदेश दिसेल.