मिरचीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा ! सव्वा एकरात ‘या’ जातीच्या मिरची पिकातून झाली 10 लाखाची कमाई; आता अख्ख्या पंचक्रोशीत रंगली चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता शेतीमध्ये बदल करू लागले आहेत. दुष्काळी जिल्हा म्हणून कूख्यात बनलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आता पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देत शेतीमध्ये आधुनिक प्रयोगाची कास धरली आहे. आता जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांची शेती करत आहेत.

आम्ही शेत जमिनीत आणि कमी वेळेत कोणतं पीक अधिक उत्पादन देईल त्याच पिकाची शेती करायची असा पवित्रा आता शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे हे धोरण त्यांना लखपती बनवत आहे. जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील रामचंद्र खामकर नामक प्रयोगशील शेतकऱ्याने देखील कमी शेत जमिनीत आणि कमी वेळेत अधिक उत्पादन मिळायला पाहिजे म्हणून शिमला मिरचीची लागवड केली.

त्यांनी आपल्या सव्वा एकर शेत जमिनीत या पिकाची लागवड केली. शिमला मिरचीच्या लागवडीचा निर्णय झाला मात्र इतर कोणत्याही अन्य पिकातून ज्या पद्धतीने अधिक उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित जातींची लागवड करणे अनिवार्य असते त्याच पद्धतीने शिमला मिरचीच्या शेतीतून अधिक कमाई करण्यासाठी याच्या सुधारित जातींची निवड करणे आवश्यक असते. ही बाब रामचंद्र यांना देखील चांगलीच ठाऊक होती.

त्यामुळे त्यांनी शिमला मिरचीच्या सुधारित जातीची तज्ञांच्या सल्ल्याने निवड केली. त्यांनी इंडस 11 व्हरायटीची 18000 शिमला मिरचीची रोपे लावली. रोप लागवड झाल्यानंतर योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याने त्यांनी व्यवस्थापनावर जातीने लक्ष घातलं. त्यांनी घेतलेले हेच परिश्रम आता त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले असून त्यांना जवळपास दहा टन शिमला मिरचीचे आतापर्यंत उत्पादन मिळाले आहे.

यातून त्यांना तब्बल तीन लाखांची कमाई देखील झाली आहे. विशेष बाब अशी की, बाजार भाव कायम राहिला आणि वातावरणात फारसा असा मोठा बदल झाला नाही तर त्यांना एकूण आठ ते दहा लाखांची कमाई होण्याची आशा आहे. म्हणजेच सव्वा एकरात आठ ते दहा लाखाची कमाई होणार आहे. निश्चितच दुष्काळी भागात केलेला हा शिमला मिरचीच्या लागवडीचा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार असून सध्या या प्रयोगाची पंचक्रोशीत चर्चा रंगत आहे.