Maharashtra News : राज्यात उष्माघाताचे प्रमाण वाढले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : राज्यात काही ठिकाणी तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढलेल्या उष्म्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. या वाढत्या तापमानाचा राज्यातील १८४ जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईत अद्याप एकाही हीट स्ट्रोकच्या रुग्णाची नोंद झालेली नाही.

एप्रिल महिना सरत असताना अनेक जिल्ह्यांतील तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या ५६ दिवसांत १८४ जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे. राज्यात यंदा तापमानात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहेत.

अनेक भागात तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. यंदा केवळ ५६ दिवसांत म्हणजे मार्चपासून आत्तापर्यंत १८४ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. २०२३ मध्ये राज्यात उष्माघाताच्या शेकडो रुग्णांची नोंद झाली.

त्यापैकी सर्वाधिक ४१२ प्रकरणे रायगडमध्ये नोंदवण्यात आली असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे वर्धा ३३४, नागपूर ३१७, चंद्रपूर १७७, नंदुरबार १७३, लातूर १६९, मुंबई उपनगर १५५, ठाणे १५३ आणि अमरावती १२४ प्रकरणे आढळून आली आहेत.

मात्र, या ठिकाणी उष्माघाताने कोणाचाही मृत्यू झाला नाही. या वर्षी मार्च महिन्यापासून धुळ्यात सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. येथील २० जणांना याचा फटका बसला आहे. याशिवाय ठाणे १९, नाशिक १७, वर्धा १६, बुलढाणा १५ आणि साताऱ्यात १४ रुग्ण दाखल झाले आहेत. उर्वरित बाधित इतर जिल्ह्यातील आहेत,

मुंबई उष्माघातग्रस्तांसाठी सज्ज

रुग्णालयांमध्ये शीतगृहातील रुग्णांसाठी दोन खाटांची व्यवस्था औषधांचा पुरेसा साठा तयार, वैद्यकीय कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाढत्या तापमानाचा लोकांच्या आरोग्यावर निश्चितच परिणाम होतो.

यामुळे, उष्माघातही होऊ शकतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये निर्जलीकरण, चक्कर येणे आणि पुरळ यांचा समावेश असू शकतो, पुरळ लाल झाल्यास वेदनादायक असू शकतो. -डॉ. कैलास बाविस्कर, सहसंचालक, आरोग्य सेवा विभाग