Ahmednagar Politics : लोखंडेंसाठी फडणवीसांनी चमत्कार केला ? अहमदनगरधील राजकीय वैरी एकत्र..

Ahmednagarlive24 office
Published:
fadnvis

Ahmednagar Politics : महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आल्याचे दिसले.

काल दुपारी लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे आयोजित फडणवीस यांच्या प्रचारसभेत आ. आशुतोष काळे, बिपीनदादा कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले.

यापूर्वी आ. आशुतोष काळे लोखंडेंच्या प्रचारात उतरलेले आहेत मात्र स्नेहलता कोल्हे या प्रचारात सक्रिय नव्हत्या. त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोनदा बैठक घेवून चर्चा केली. मात्र, कालपर्यंत त्या सक्रिय नव्हत्या.

आज गुरूवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात काळे-कोल्हे-वहाडणे हे कोपरगाव तालुक्यातील प्रमुख राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी हेच सक्षम देशाचे पंतप्रधान आहे, त्यांच्याशिवाय देशाला दुसरा पर्यायही नाही. अशा सक्षम नेत्याना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून त्यांचे हात बळकट करायचे आहे तसेच लोखंडे यांना विजयी करून त्यांचीही हॅट्रीक साधायची असल्याचे यावेळी कोल्हे यांनी स्पष्ट केले.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे- कोल्हे हे दोन राजकीय ताकद असणारे गट आहेत. याशिवाय माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा शहरात दबदबा आहे. आता कोपरगावमध्ये लोखंडे यांच्या प्रचारासाठी

काळे कोल्हे हे दोन प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी आणि माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे एकत्र आल्याने कोपरगावामधून सर्वाधिक लीड मिळणे त्यामुळे अपेक्षित आहे. यावेळी मंत्री दादा भुसे, निलम गो-हे, बिपीनदादा कोल्हे, आ. आशुतोष काळे, विठ्ठलराव लंघे, विजय वहाडणे, राजाभाऊ कापसे आदी उपस्थित होते.

शिंदेंना जमलं नाही पण फडणवीसांनी बोलताच…
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी त्यावेळी जास्त प्रतिसाद दिलाच नाही. परंतु फडणवीस यांच्या चर्चेनंतर मात्र कोल्हे आता प्रचारात सक्रिय दिसल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe