Electric Bike : आकर्षक लूक असणारी OXO इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च; सिंगल चार्जमध्ये चालणार 150 किमी…

Published on -

Electric Bike : देशात आता अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक आणि कार लॉन्च केल्या जात आहेत. वाढत्या इंधनाच्या किमती पाहता आजकाल अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. बाजारात आता जबरदस्त लूक असणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च झाली आहे.

जयपूर स्थित इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप हॉप इलेक्ट्रिक मोबिलिटीने पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. Hop Oxo असे या इलेक्ट्रिक बाईकचे नाव आहे. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये मजबूत बॅटरी देण्यात आली आहे.

कंपनीकडून Hop Oxo पाच रंगामध्ये सादर करण्यात आली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.56 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. हैद्राबाद ई-मोटर शोमध्ये हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाईक सादर करण्यात आली.

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यावर अधिक भर देत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त आहेत.

हॉप ऑक्सो 6.2KW इलेक्ट्रिक मोटरसह 72V आर्किटेक्चरवर तयार करण्यात आलेली बाईक आहे. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक मोटर 200 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

ई-बाईकला 3 राइडिंग मोड देण्यात आले आहेत ज्यात इको, पॉवर आणि स्पोर्टचा समावेश आहे, तर तिचा टॉप स्पीड 90 किमी/तास आहे. कंपनीने नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 3.75 kWh-R लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक बाईक सिंगल चार्जमध्ये 150 किमी पर्यंतची रेंज देते.

ई-बाईक किती वेळात चार्ज होणार

ही इलेक्ट्रिक बाईक ट्वायलाइट ग्रे, कँडी रेड, मॅग्नेटिक ब्लू, इलेक्ट्रिक यलो आणि ट्रू ब्लॅक रंगामध्ये सादर करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक पोर्टेबल चार्जरच्या मदतीने 4 तासांपेक्षा कमी वेळेत 0-80 टक्के चार्ज होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News