Eknath Shinde : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पहिल्यांदाच अमेरिकेत दणक्यात वाढदिवस, टाईम्स स्क्वेअरमध्ये मोठा जल्लोष

Published on -

Eknath Shinde : आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. तसेच त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे असंख्य समर्थक आहेत. तसेच परदेशात देखील तरूणाईला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडायला लागली आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

भारतीय वंशाच्या पण न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या काही तरूणांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस तिथे साजरा केला. तेथील तरुणांनी केक कापून एकच केला, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडीओवरून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

अभिनव जैन, राजीव पंड्या, रूचिता जैन अशी या वाढदिवस साजरा करणाऱ्या तरूणांची नावे आहेत. या तरूणांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स तयार करून ते टाईम्स स्क्वेअर आणि ग्रँण्ड सेंट्रल येथे झळकवले आहेत.

मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगळी भेट देण्यासाठी त्यांचा वाढदिवस अशाप्रकारे साजरा करण्याचा निर्णय या तरूणांनी घेतला आहे. दरम्यान, ठाण्यात एक मोठा केक तयार करण्यात आला आहे.

त्यावर एकनाथ शिंदे यांचा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास रेखाटण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात देखील अनेक राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News