Honor Smartphone : दिग्ग्ज टेक कंपनी Honor ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Honor X8a लाँच केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टफोनसोबत आता ग्राहकांना 4 हजार रुपयांचे फिटबँड मोफत मिळत आहे. जर तुम्हालाही हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
कारण हा स्मार्टफोन फक्त युके आणि मलेशियामध्ये लाँच झाला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच होऊ शकतो. ग्राहकांसाठी कंपनी यात 100MP कॅमेरा देत आहे. तसेच MediaTek Helio G88 चिपने सुसज्ज असणार आहे. हा फोन कंपनीने दोन स्टोरेज पर्यायात सादर केला आहे.
किती आहे किंमत
Honor च्या नवीन स्मार्टफोनची किंमत UK मध्ये 6GB + 128GB च्या बेस व्हेरिएंटसाठी EUR 220 (अंदाजे रु. 19,500) आहे. तेथे प्री-ऑर्डरवर फक्त बेस व्हेरिएंट उपलब्ध असून मलेशियन ग्राहकांकडे सध्या फक्त 8GB+128GB व्हेरिएंटची प्री-ऑर्डर करण्याचा पर्याय उपलब्ध असून ज्याची किंमत RM 999 (अंदाजे रु. 19,200) इतकी आहे.
यूएईमध्ये 14 फेब्रुवारीपूर्वी Honor X8a ची प्री-ऑर्डर करणार्या वापरकर्त्यांना Honor Band 6 (फ्लिपकार्टवर रु. 3,999) मोफत मिळेल. तर मलेशियातील वापरकर्त्यांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हा फोन तीन रंग पर्यायांमध्ये खरेदी करता येईल – मिडनाईट ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर आणि सायन लेक. हा स्मार्टफोन लवकरच इतर जागतिक बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकतो.
असे असतील स्पेसिफिकेशन
कंपनीचा आगामी फोन MediaTek Helio G88 चिपने सुसज्ज असणार आहे. हा स्मार्टफोन 6GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह, आणि दुसरा 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज अशा दोन प्रकारांमध्ये येतो. तसेच हे लक्षात ठेवा की हा स्मार्टफोन विस्तारण्यायोग्य स्टोरेज देत नाही.
कंपनीने यात फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात f/1.9 अपर्चर आणि ऑटो-फोकससह 100-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्स आहे. सेटअपमध्ये 5-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी, स्मार्टफोन पंच-होल कटआउटमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा पॅक करतो. हा Android 12 आधारित मॅजिक UI 6.1 आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालतो आणि 22.5W जलद चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी पॅक करतो.