Business Idea : सध्या अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय करू लागले आहेत. देशात 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहे. काहीजण तर बांबूची शेती करून लाखो रुपये कमावत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकार या व्यवसायासाठी मदत करत आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकरने 2006-2007 मध्ये राष्ट्रीय बांबू मिशन सुरू केले आहे. याच्याच मदतीने हा व्यवसाय सुरु करणाऱ्याला सबसिडी दिली जाते. तसेच बांबूची शेती करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रशिक्षणाची गरज लागत नाही.
अशाप्रकारे करा बांबूची लागवड
हे लक्षात घ्या की बांबूची लागवड हंगामानुसार होत नाही. त्याच्या लागवडीस 4 वर्षे लागतात. या लागवडीसाठी मातीचे pH मूल्य 6.5 ते 7.5 पर्यंत असणे गरजेचे आहे. एक हेक्टरमध्ये 625 बांबू रोपे लावता येतात. वेळोवेळीया रोपांची काढणी करावी.
किती मिळते उत्पन्न
हेक्टरी सुमारे 1 हजार 500 झाडे लावली जातात. बांबूचे पीक सुमारे ३ वर्षात तयार होते. याच्या 1 रोपाची किंमत 250 रुपये असून यामध्ये सरकारकडून अनुदान उपलब्ध आहे. सरकारने बांबू लागवडीसाठी राष्ट्रीय बांबू मिशन चालवले आहे. सुरुवातीला तुम्ही सुमारे 2 लाख रुपये खर्च कराल आणि 3 वर्षांनंतर तुम्हाला 1 हेक्टरमधून सुमारे 3.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. यानंतरही तुमचे उत्पन्न सुरूच राहील.
एकदाच लागवड करून आयुष्यभर कमवा पैसे
या शेतीच्या लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पीक 40 वर्षे चालू राहते, समजा जर तुम्ही वयाच्या 25-30 व्या वर्षी बांबूची लागवड करत असाल तर तुम्ही वयाच्या 65-70 वर्षापर्यंत कमाई करू शकता. तुम्ही एकदा लागवड करून आयुष्यभर पैसे कमवू शकता. या पिकाला जास्त देखभाल करावी लागत नाही.