EPFO Update : मोठी बातमी ! तुमचे पैसेही EPFO मध्ये जमा असेलतर लवकर करा ‘हे’ काम ; नाहीतर करावा लागेल पश्चाताप

Ahmednagarlive24 office
Published:

EPFO Update : तुम्ही देखील नोकरी करत असाल तर तुमचे पैसे देखील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO जमा होत असेल. जर तुमचे पैसे देखील EPFO मध्ये जमा होत असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्याकडे देखील एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असेल याच्या मदतीने तुम्ही भविष्य निर्वाह निधीची शिल्लक जाणून घेऊया शकतात.

म्हणूनच तुम्ही हे खाते नेहमी अपडेट ठेवले पाहिजे तसेच आता तुम्हाला त्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे.तुम्ही तुमच्या EPF मध्ये अजून KYC अपडेट केले नसेल, तर ते लवकर करा. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही KYC अपडेट आता घरी बसून देखील करू शकतात त्यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया देखील सांगणार आहोत. चला मग जाणून घेऊया या बद्दल संपूर्ण माहिती.

EPFO मध्ये KYC अपडेट करण्यासाठी स्टेप्स

EPFO पोर्टलवर Know Your Customer Details अपडेट करण्यासाठी स्टेप्स पुढीलप्रमाणे आहेत

स्टेप 1 – प्रथम EPF खात्यात लॉग इन करा. यासाठी UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड यांसारखी क्रेडेन्शियल्स आवश्यक आहेत.

स्टेप 2 – ‘Manage’ सेक्शन ड्रॉप-डाउन सूचीमधून ‘KYC’ शोधा आणि त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 – सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि अपडेट करण्यासाठी दस्तऐवजाच्या बॉक्सवर टिक करा. यासाठी कागदपत्र क्रमांक, तुमचे नाव आणि अतिरिक्त तपशील आवश्यक असतील.

स्टेप 4 – ‘पेंडिंग केवायसी’ विभागात ‘सेव्ह’ वर क्लिक करा.

स्टेप 5 – अपडेट दस्तऐवज संबंधित डेटा विभागाकडून व्हेरीफाय केला जातो. त्यानंतर तपशील ‘ व्हेरीफाय ‘ म्हणून चिन्हांकित केला जाईल.

ईपीएफचा टीडीएस दर कमी करण्यात आला आहे

माहितीसाठी हे जाणून घ्या अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) काढण्यावरील कर कपात (TDS) कमी करण्यात आली आहे. टीडीएस 30 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आला आहे आणि तो पॅन नसलेल्या प्रकरणांमध्ये लागू आहे. ते पाच वर्षापूर्वी काढण्यासाठी आणले आहे. दुसरीकडे, जर पीएफचे पैसे पाच वर्षापूर्वी काढले गेले आणि पॅन कार्ड देखील दिले गेले असेल, तर अशा परिस्थितीत 10 टक्क्यांपर्यंत टीडीएस भरावा लागेल.

हे पण वाचा :- Business Idea: फक्त 10,000 च्या गुंतवणुकीतून सुरु करा ‘हा’ जबरदस्त व्यवसाय ; होणार दरमहा हजारोंची कमाई

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe