Congrass MLA : अधिवेशनापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटतील, बड्या नेत्याच्या वक्तव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले

Published on -

Congrass MLA : महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटतील, हे सध्याच सांगणे शक्य नाही. पण १० ते १२ आमदार फुटणार, हे मात्र नक्की, असे वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. यामुळे आता अधिवेशनात सुरू होण्यापूर्वीच विरोधकांचे टेन्शन वाढले आहे.

तसेच ते म्हणाले, २० ते २५ आमदार जरी इकडे तिकडे झाले, तरी सरकार मजबुतीने राहील आणि सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. ठाकरे गटातील आमदार फुटण्याचा प्रश्‍नच राहिलेला नाही. कारण तेथून जे निघायचे होते, ते आधीच निघालेले आहेत, असेही ते म्हणाले.

तसेच शिवसेनेतील ४० आमदार फुटल्यानंतर ही मोठी घडामोड राज्यात होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या १० ते १५ दिवसांत आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अगोदर ही घडामोड होणार आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

दरम्यान, आता बच्चू कडू यांनी हा दावा केल्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदारांकडे संशयाच्या नजरेने बघितले जात आहे. तसेच कडू यांच्या या दाव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. हे आव्हान देणे आता पोचट झाले आहे. अशा आव्हान देण्याला काही अर्थ नाही. आदित्य ठाकरेंचा हा बालिशपणा आहे, असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News