Electric WagonR Car : इलेक्ट्रिक WagonR बाजारात करणार कहर, सिंगल चार्जमध्ये 200 किमी धावणार, किंमतही कमी

Ahmednagarlive24 office
Published:

Electric WagonR Car : मारुती सुझुकी कंपनीकडून लवकरच नवीन सेगमेंटमध्ये WagonR लॉन्च केली जाणार आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार सर्वाधिक विकल्या जात आहेत. तसेच कंपनीकडून नवंनवीन कार देखील बाजारात लॉन्च केल्या जात आहेत.

मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कारला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद दिला जात आहे. मारुती सुझुकी कंपनी लवकरच नवीन रूपात अल्टो कार पेट्रोल इंजिन आणि WagonR इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

देशात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. आता मारुती सुझुकी कंपनी देखील इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यावर अधिक भर देत आहेत.

WagonR EV मध्ये फास्ट चार्ज पर्याय उपलब्ध असेल

देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यावर अधिक भर देत आहेत. मारुतीची WagonR EV ही कार देखील लवकरच बाजारात पदार्पण करणार आहे.

कंपनी कारसोबत फास्ट चार्जरचा पर्यायही देऊ शकते, ज्यामुळे कारची बॅटरी 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी एका तासापेक्षा कमी वेळ लागेल. आणि जी सिंगल चार्जमध्ये 200 किलोमीटरहून अधिक अंतर कापू शकते.

डिझाइन आणि वैशिष्ट्ये

जुन्या WagonR आणि नवीन इलेक्ट्रिक WagonR मध्ये कंपनीकडून अनेक बदल करण्यात आले आहेत. जुन्या कारपेक्षा नवीन कारचा लूक खूपच वेगळा देण्यात आला आहे. स्पॉटेड मॉडेलला एलईडी लाइटिंगसह स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आणि नवीन लोअर बंपर मिळतो ज्यामध्ये नवीन एलईडी फॉग लाईट देण्यात आल्या आहेत.

स्पॉटेड मॉडेल B आणि C-पिलर ब्लॅक-आउट झाले आहे. मागील बाजूस, WagonR EV ला अनुलंब ठेवलेल्या LED टेल-लॅम्प्स आणि उभ्या रिफ्लेक्टरसह एक अपडेटेड बंपर देण्यात आला आहे.

कधी होणार लॉन्च

भारतीय बाजारपेठेत लवकरच मारुती सुझुकी इलेक्ट्रिक WagnoR लॉन्च करण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून कंपनीकडून या कारची चाचणी सुरु आहे. या कारची किंमत 9 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe