महाराष्ट्राला मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचीं भेट !; 3 तासात दोन्ही शहरादरम्यान प्रवास होणार, समृद्धी महामार्गलगत बनणार ट्रॅक, ‘ही’ राहतील स्टेशनं, पहा सविस्तर

Published on -

Nagpur Mumbai Bullet Train : महाराष्ट्राला आज नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे दोन वंदे भारत ट्रेनची सौगात मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेन चे उद्घाटन मध्य रेल्वेच्या माध्यमातून आयोजित झाले आहे. निश्चितच यामुळे मुंबईहुन पुणे, सोलापूर आणि नाशिक शिर्डी दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. अशातच आता महाराष्ट्रासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.

महाराष्ट्राला लवकरच अजून एक बुलेट ट्रेनचा नजराना मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून ही माहिती समोर येत आहे. दानवे यांनी नाशिक दौऱ्यावर मुंबई नागपूर बुलेट ट्रेन बाबत मोठी घोषणा केली आहे. दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडल्या गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या बाजूने मुंबई नागपूर बुलेट ट्रेन धावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ही बुलेट ट्रेन चालू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष बाब अशी की या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वार्तालाप देखील केला आहे. आता या संदर्भात पुढील महिन्यात दिल्लीमध्ये मंथन होणार आहे. दिल्लीत एका बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एवढेच नाही तर बुलेट ट्रेन साठी आवश्यक जागा देखील निश्चित झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दानवे यांच्या मते बुलेट ट्रेन जर सुरू झाली तर राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान चा प्रवास मात्र तीन तासात शक्य आहे.

2019 मध्ये तयार झाला होता प्रस्ताव

नागपूर ते मुंबई या दोन राजधान्यांना जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा प्रस्ताव खरं पाहता 2019 मध्ये तयार झाला होता. 741 किलोमीटर लांबीची हा बुलेट ट्रेन मार्ग राहणार असल्याचे सांगितलं गेलं होतं. बुलेट ट्रेनची 700 प्रवाशांना बसवण्याची क्षमता राहील असं देखील त्या प्रस्तावात होतं. विशेष म्हणजे त्या प्रस्तावात संभावित रेल्वे स्टेशन देखील समाविष्ट करण्यात आली होती.

खापरी डेपो वर्धा पुलगाव कारंजा लाड मालेगाव जहांगीर मेहकर जालना औरंगाबाद शिर्डी नाशिक इगतपुरी आणि शहापूर हे स्टेशन असणार असल्याचे सांगितले गेले होते. विशेष म्हणजे ही बुलेट ट्रेन 350 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करणार असं सांगितलं जातं आहे. निश्चितच आता नागपूर मुंबई ट्रेन बाबत खुद्द केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी माहिती दिली असल्याने पुन्हा एकदा या बुलेट ट्रेन च्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

मोठी बातमी ! समृद्धी महामार्गाचा विस्तार ‘या’ दोन जिल्ह्यापर्यंत होणार, ‘या’ सहा जिल्ह्यात लॉजिस्टिक कॉरिडोर तयार करणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News