Shani Asta Effect : तुम्ही अनेकदा ऐकले असेल की शनीची साडेसाती आहे किंवा शनिदोष आहे. मात्र आता शनीबाबत काळजी घेणे गरजचे आहे. कारण शनि मावळला आहे. तसेच आता बरेच दिवस शनी अस्तच राहणार आहे. त्यामुळे काही चुकीची कामे करणे टाळणे गरजेचे आहे.
शनि मानवाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो, म्हणूनच त्याला न्यायाचा देव आणि कर्माचा दाता म्हटले जाते. 17 जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. 31 जानेवारीला पहाटे 2.46 वाजता शनिदेवाचा प्रवास सुरु झाला आहे.
३३ दिवस शनिदेव अस्त अवस्थेत राहणार आहेत. 5 मार्च रोजी रात्री 8.46 वाजता कुंभ राशीतच उदय होणार आहे. ज्या लोंकाना शनीची साडेसती, धैय्या किंवा शनिदोषाने त्रास होत असेल त्यांनी काही कामे न करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
दारू आणि मांस
ज्या लोकांना शनिदोष किंवा शनिसाडेसाती आहे अशा लोकांनी मांसाहार आणि दारूचे सेवन टाळावे. चुकूनही अशा पदार्थांचे सेवन करू नये अन्यथा शनिदेव क्रोधीत होऊ शकतात. असे केल्याने अपयश येऊ शकते.
आदर
या दिवसांत अनेकांनी आई-वडील आणि वडीलधाऱ्यांचा आदर करावा. चुकूनही अशा लोकांचा अपमान करणे तुमच्यासाठी चुकीचे ठरू शकते. याचा वाईट परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतो. नेहमी सर्वांशी आदराने वागले पाहिजे.
प्राणी आणि पक्षी
शनि अस्ताच्या वेळी मुक्या, पशू-पक्षी इजा करणे टाळावे. जाणूनबुजून किंवा नकळत जे या जीवांना दुखवतात किंवा मारतात, त्यांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो.