Two Wheeler Insurance : आता घरच्या घरी बनवा तुमच्या टू व्हीलरचा विमा, मिळेल भरपूर सवलत

Ahmednagarlive24 office
Published:

Two Wheeler Insurance : सध्याच्या काळात प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन आहे. जास्तीत जास्त दुचाकी वाहने आपण अनेकांकडे पाहतो. देशात दररोज कितीतरी अपघात होतात. अपघात टाळता यावे यासाठी वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहेत. वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे सर्व कागदपत्र गरजेची आहेत.

जर तुमच्याकडे एखादे कागदपत्र नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. यापैकी एक कागदपत्र म्हणजे विमा. जर तुमच्याकडे विमा नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. विमा काढण्यासाठी अनेकजण कंपन्यांकडे जातात. परंतु, अनेक कंपन्या जास्त पैसे घेतात. परंतु तुम्ही आता घरी विमा काढू शकता.

बनवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1

जर तुम्हाला तुमच्या दुचाकीचा घरबसल्या काढायचा असेल तर तुम्हाला अगोदर ऑनलाइन कंपन्यांचे प्लॅन पाहावे लागणार आहेत. तुम्हाला कमी किमतीत चांगल्या वैशिष्ट्यांसह तुम्हाला विमा निवडावा लागेल. यासाठी सर्व कंपन्यांच्या प्लॅनची ​​तुलना करून प्लॅन निवडा

स्टेप 2

  • यानंतर तुम्हाला वेबसाइटवर जाऊन दुचाकी विम्याचा पर्याय निवडावा लागणार आहे.
  • तुम्हाला तुमच्या वाहनाची माहिती जसे की वाहन क्रमांक, मॉडेल इत्यादी विचारले जाईल ती भरा.

स्टेप 3

  • मग तुम्हाला स्क्रीनवर विमा कोट आणि विमा प्रीमियम असा पाहायला मिळेल.
  • जर तुम्हाला ते आवडत असेल तर ते निवडून पुढे जा
  • तुमच्या वाहनासाठी कंपनीने काय शुल्क आकारले आहे ते देखील तुम्हाला तपासावे लागेल.

स्टेप 4

  • त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यासारखी इतर माहिती भरावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने पैसे भरावे लागणार आहे.
  • पेमेंट होताच तुमचा विमा तुमच्या ईमेलवर येईल. तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते डाउनलोड करू शकता.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe