Disha Patani Photos : दिशा पटानी स्वतःला कशी ठेवते फिट? जाणून घ्या यामागचे रहस्य

Published on -

Disha Patani Photos : ‘बागी गर्ल’ म्हणून दिशा पटानीची ओळख आहे. तिने बॉलिवूडमध्ये ‘एमएस धोनी : अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिने साकारलेली भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने आयटम सॉंग्समध्ये ही काम केले आहे.

सोशल मीडियावर ही अभिनेत्री खूप सक्रिय असते. सतत ती सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस लूक्समधील फोटो शेअर करत असते. इतकेच नाही तर ती फिटनेसचे व्हिडिओ आणि फोटो ही शेअर करत असते. तसेच ती वर्कआऊटसाठीही खूप प्रसिद्ध आहे. ती इतकी फिट कशी राहते असा प्रश्न अनेकांना पडतो जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.

अनेकजण शक्यतो सकाळी जिमला जातात परंतु दिशा दिवसातून दोन वेळा वर्कआउट करत असते. ती सकाळी कार्डिओ व्यायाम तर संध्याकाळी वेट लिफ्टिंग करते.

ट्रेडमिल शिवाय तिच्या फिटनेस रुटीनमध्ये जास्त वर्कआउटचा समावेश नाही. ती सकाळी जिम्नॅस्टिक आणि किकबॉक्सिंग करते.

तिच्या फिटनेस रुटीनमध्ये पिलेट्स, पोहणे, नृत्य, वजन प्रशिक्षण आणि योगाचा समावेश आहे. या अभिनेत्रीला नवनवीन नृत्य प्रकार खूप आवडतात. कोणत्याही प्रकारचा नृत्यप्रकार केला तर महिला तंदुरुस्त राहत असल्याचे तिचे मत आहे.

दिशा डाएट रूटीनचे काटेकोरपणे पालन करून पोषण आणि प्रथिने युक्त आहाराचा आपल्या जेवणात समावेश करते. ती टोस्ट, दूध आणि ज्यूस न्याहारीसाठी तर ताजी फळे आणि ज्यूस दुपारच्या जेवणासाठी घेते. रात्री कोशिंबीर, ब्राऊन राइस आणि मसूर तर भात आणि चिकन तिचे आवडते पदार्थ आहेत.

ती कार्डिओ व्यायामासह हलके वजन प्रशिक्षणावर अधिक भर देत असून तिच्या फिटनेस रूटीनने अनेकांना खूप प्रेरित करत असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe