Cheapest Shopping : अनेकांना फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या वेबसाइटवरून खरेदी करायला खूप आवडते. या वेबसाइटवर वस्तू चांगल्या मिळतात. तसेच या वेबसाइटवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जातात. त्यामुळे ग्राहक या वेबसाइटला पहिले प्राधान्य देतात.
परंतु, आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनशिवाय अजून एक अशी वेबसाइट आहे की ज्यावर वस्तू अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत. ही जागतिक वेबसाइट नसली तरी तिची चर्चा सुरु आहे. या वेबसाइटचे नाव मीशो हे आहे. मीशोवर सर्व वस्तू या चांगल्या मिळतात.
कोणती आहे वेबसाइट
मीशो या वेबसाइटवर अनेक ग्राहक खूप सक्रिय असून त्यावर जोरदार खरेदी करत आहेत. यामागचे कारण म्हणजे त्यावर उपलब्ध असलेली स्वस्त सामग्री. मीशो ही Amazon आणि Flipkart सारखी जागतिक वेबसाइट नसली तरी तिची खूप चर्चा होत आहे. जर तुम्ही अजून या वेबसाइटवरून खरेदी केले नसेल, तर कोणत्या उत्पादनावर खरेदी करता येत आहे ते जाणून घेऊया.
मीशो या प्रोडक्टची विस्तृत श्रेणी असून तिथून तुम्ही तुमच्या आवडत्या प्रोडक्टची खरेदी करू शकता. या उत्पादनात तुम्हाला स्मार्टफोन आणि लॅपटॉप खरेदी करता येणार नाही, पण तुम्हाला स्मार्टफोन अॅक्सेसरीज खरेदी करता येईल.
या अॅक्सेसरीज 100 रुपयांपासून सुरू होतात ज्या 1000 रुपयांपर्यंत जातात.जर कपड्यांबद्दल बोलायचे झाले तर, यावर खूप मोठी श्रेणी आहे, जी 350 रुपयांपासून सुरू होते आणि 1000 रुपयांपर्यंत जाते. ही किंमत बाजारभावाच्या निम्म्यापेक्षा कमी असून तुम्ही या वेबसाइटवरून खरेदी केली तर तुमची बचत निश्चित होईल, तसेच तुम्हाला उत्तम उत्पादन खरेदी करता येईल.