Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, नव्या राज्यपालांचीही नियुक्ती

Published on -

Bhagat Singh Koshyari ; राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते.

अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.

हे आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

दरम्यान, रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात मोठी आंदोलने केली होती. त्यानंतर राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.

यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला होता. हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe