Valentine Day 2023 : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी असे अनेक लोक आहे ज्यांना पार्टी करायला आवडते. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या भारतात व्हॅलेंटाईन वीक आनंदाने साजरा करण्यात येत आहे. 14 फेब्रुवारी दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे यासाठी आज आम्ही तुम्हाला या लेखात काही टिप्स सांगणार आहोत जे तुम्ही फॉलो केल्यास तुमचे हजारो रुपये वाचू शकतात. चला मग जाणून घेऊया या संपूर्ण माहिती.
तुम्हाला हे माहिती असेलच प्रेमी युगुलांसाठी 14 फेब्रुवारी हा दिवस किती खास असतो. यामुळेच आज व्हॅलेंटाईन डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो कोणी कोणाला गिफ्ट्स देतात तर कोणी काही तर काही जण असे देखील आहे जे या दिवशी पार्टी करतात. या दिवशी पार्टीच्या मूडमध्ये बरेच लोक वाहन चालवताना काही चुका करतात ज्या त्यांना महागात पडू शकतात. इतके की त्या किमतीत लोक त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसाठी छान गिफ्ट खरेदी करू शकतात.
व्हॅलेंटाईन डे ह्या चुका करू नका
ड्रिंक अँड ड्राइव
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पार्टी करताना कधीही मद्यपान करून गाडी चालवू नका. मद्यपान करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे आणि तुमच्यासह रस्त्यावरील इतर लोकांसाठी ते धोकादायक आहे.
ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पार्टी करताना ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन करू नये. ट्रॅफिक सिग्नल तोडताना पकडले जाणे तुम्हाला महागात पडू शकते.
वाद घालणे
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेकवेळा वाहतूक पोलीस लोकांना थांबवून प्रश्न विचारू लागतात. अशा परिस्थितीत मन नेहमी शांत ठेवावे आणि वादविवाद टाळावेत. वादाची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
महत्त्वाची कागदपत्रे
जवळ न ठेवणे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या नादात ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, वाहनांची कागदपत्रे, पीयूसी प्रमाणपत्र आणि विम्याची कागदपत्रे यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे विसरता कामा नये. या कागदपत्रांशिवाय गाडी चालवताना पकडल्यास मोठी किंमत मोजावी लागते.
हे पण वाचा :- Smartphones Offers : चर्चा तर होणारच ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे ‘हा’ 5G फोन ; ऑफर पाहून वाटेल आश्चर्य