Rihanna Pregnancy : बाबो .. ‘ही’ गायिका होणार लग्नाशिवाय दुसऱ्यांदा आई ! पहिल्या मुलाच्या 9 महिन्यांनंतर पुन्हा गर्भवती ; अनेक चर्चांना उधाण

Published on -

Rihanna Pregnancy : आपल्या आवाजाने संपूर्ण जगात फेमस होणारी प्रसिद्ध गायिका रिहाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी तिच्या चर्चेत येणाचे कारण म्हणजे ती पुन्हा एकदा गर्भवती झाली आहे. यामुळे आता ती लग्नाशिवाय दुसऱ्यांदा मुलाचे स्वागत करणार आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोवर्स आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि अमेरिकेत दरवर्षी होणार्‍या सर्वात मोठ्या फुटबॉल इव्हेंटमध्ये नेहमीच जगातील काही मोठ्या संगीतकार परफॉर्म करत असतात. या कार्यक्रमात रिहानाही परफॉर्म करण्यासाठी आली होती. रिहानाने सुपर बाउल LVII मध्ये भाग घेतला आणि बेस्ट परफॉर्मन्स दिली. दरम्यान रिहानाचा बेबी बंप सर्वांच्या लक्षात आला. त्याचबरोबर सिंगरच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेलाही पुष्टी मिळाली आहे. सोशल मीडियावर चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत. रिहाना आधीच एका मुलाची आई आहे.

रिहाना दुसऱ्यांदा आई होणार

हॉलिवूड गायिका रिहाना आणि तिचा प्रियकर रॉकी लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहेत. आपल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी हे जोडपे खूपच उत्सुक आहे. रिहानाने अलीकडेच एका कार्यक्रमात तिचा बेबी बंप फ्लॉंट केला. रिहाना परफॉर्मन्सदरम्यान पोट रब करताना दिसली आणि तिच्या कपड्यांची झिपही तिने उघडी ठेवली. यादरम्यान तिने तिचा बेबी बंपही दाखवला.

रिहानाचे अजून लग्न झालेले नाही

रिहानाने 2021 मध्ये तिचा प्रियकर रॉकीसोबतच्या नातेसंबंधाची अधिकृतपणे पुष्टी केली होती. एका मुलाखतीत रॉकीने रिहानाला ‘लव ऑफ माय लाइफ’ असेही संबोधले होते. यानंतर ग्रॅमी विजेती रिहाना आणि तिचा बॉयफ्रेंड रॅपर एस्पी रॉकी यांनी 2022 मध्ये त्यांच्या मुलाचे स्वागत केले. गायिकेने तिच्या पहिल्या गरोदरपणात अनेक बातम्या निर्माण केल्या होत्या. तिचे रिव्हिलिंग फोटोशूट चर्चेत होते.

जरी रिहानाने अद्याप लग्न केले नाही. रॉकी आणि रिहाना जुने मित्र आहेत. दोघांनी 2020 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. यानंतर रिहानाने लग्नाबाबत सांगितले की, तिला बेबी बंपमध्ये लग्न करायचे नाही. त्याने जानेवारी 2023 मध्ये लग्नाची घोषणाही केली होती. दुसरीकडे जर आपण रिहानाच्या कामाबद्दल बोललो तर ती शेवटची 2016 मध्ये एका अल्बममध्ये दिसली होती. यानंतर 2018 साली त्यांनी लाईव्ह परफॉर्मन्स दिला. रिहानाने जवळपास सात वर्षांपासून एकही अल्बम रिलीज केलेला नाही.

हे पण वाचा :-  Hardik Pandya-Natasha Wedding : काय सांगता ! 14 फेब्रुवारीला दुसरे लग्न करणार हार्दिक पांड्या ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe