Valentine Day Offer : व्हॅलेंटाईन डेची बंपर ऑफर ! ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर आज मिळणार खूप स्वस्तात; होईल हजारोंची बचत

Ahmednagarlive24 office
Published:

Valentine Day Offer : आज व्हॅलेंटाईन डे आहे. जर तुम्ही आज तुमच्या जोडीदारासाठी नवीन स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर आहे.

कारण इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी ओकिनावा ऑटोटेकने आपल्या ग्राहकांसाठी व्हॅलेंटाईन डे ऑफर आणली आहे. ओकिनावा ऑटोटेकने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निवडक श्रेणीवर विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत.

या ऑफर अंतर्गत कंपनीच्या तीन स्कूटर 12,500 रुपयांपर्यंत डिस्काउंटवर खरेदी करता येतील. विशेष म्हणजे ही डिस्काउंट ऑफर 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

ओकिनावा कंपनी PraisePro, OKhi-90 आणि iPraise+ सारखी मॉडेल्स विकते. कंपनीने जाहीर केले आहे की व्हॅलेंटाईन डे ऑफर iPraise+, PraisePro आणि Ridge+ सारख्या हाय-स्पीड मॉडेल्स आणि R30 आणि Lite सारख्या कमी-स्पीड ऑफरवर लागू होईल.

दरम्यान, iPraise+ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 145,965 रुपये आहे. मात्र ऑफरनंतर ही स्कूटर स्वस्तात खरेदी केले जाऊ शकते. ही स्कूटर 3.6 kWh बॅटरीसह येते आणि पूर्ण चार्ज करून 137KM धावू शकते. स्कूटरचा टॉप स्पीड 50 किमी प्रतितास आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात.

त्याचप्रमाणे iPraise Pro इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,645 रुपये आहे. मात्र ऑफरनंतर ते स्वस्तात खरेदी केले जाऊ शकते. ही स्कूटर 2.08 kWh बॅटरीसह येते आणि पूर्ण चार्ज करून 81KM धावू शकते. स्कूटरचा टॉप स्पीड 50 किमी प्रतितास आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी 2-3 तास लागतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe