PM Kisan 13th Installment : प्रतीक्षा संपली! या तारखेला खात्यात येणार पीएम किसान योजनेचे 2000 रुपये

Ahilyanagarlive24 office
Published:

PM Kisan 13th Installment : शेतकऱ्यांना अजूनही पीएम किसान योजनेचा १३वा हफ्ता मिळालेला नाही. पीएम किसान योजनेच्या १३ व्या हफ्त्याची प्रतीक्षा लांबत चालली आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच २००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.

केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षामध्ये ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति २ हजार रुपयांनी जमा केले जातात.

मोदी सरकारच्या पीएम किसान योजनेला २४ फेब्रुवारी रोजी ४ वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थिती मोदी सरकारकडून २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हफ्त्याचे २ हजार रुपये जमा केले जाऊ शकतात.

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लागणार आहेत. त्यामुळे भाजपकडून लवकरच या निवडणुकीची मोहीम आखली जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचा किसान मोर्चा 24 फेब्रुवारीपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे.

24 फेब्रुवारीला खात्यात जमा होणार पैसे

मोदी सरकारकडून २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात १३व्या हफ्त्याचे २ हजार रुपये वर्ग केले जाऊ शकतात. कारण या दिवशी या योजनेचे चार वर्षे पूर्ण होणार असून मोदी सरकार या दिवशी पैसे जमा करू शकते.

पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवाद साधणार

यावेळी पंतप्रधान पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. यावेळी शेतकऱ्यांचा अभिप्रायही घेतला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ही सर्व तयारी सुरू आहे.

किसान मोर्चा शेतकऱ्यांपर्यंत आपला संदेश देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करेल. पीएम किसान सन्मान निधीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे आतापर्यंत १२ हफ्ते आले आहेत. मात्र नवीन वर्षात शेतकऱ्यांना अजून एकही हफ्ता आलेला नाही. त्यामुळे आता या महिन्यातील २४ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्ते आले आहेत. मात्र 13व्या हप्त्याची प्रतीक्षा लांबत चालली आहे. वास्तविक, पीएम किसानमध्ये बनावट लाभार्थींचा सहभाग असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे.

त्यामुळे सरकार सतत ई-केवायसीवर भर देत आहे. या वेळी ज्या लाभार्थींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्या खात्यावर हप्त्याचे पैसे पाठवले जाणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe