7th Pay Commission Breaking : कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये होणार 4 टक्क्यांची वाढ, इतका वाढणार पगार…

Ahilyanagarlive24 office
Published:

7th Pay Commission Breaking : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण नवीन वर्षातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक १ मार्च रोजी होणार आहे. या बैठकीत डीए वाढीला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. जर कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ झाली तर पगारातही मोठी वाढ होणार आहे.

होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मोठी भेट देऊ शकते. एआयसीपीआयच्या आकडेवारीत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सातत्याने वाढ झाली होती. पण डिसेंबरमध्ये एआयसीपीआयच्या आकडेवारीत थोडीशी घसरण झाली आहे.

नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरचा आकडा 132.3 अंकांवर घसरला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हा आकडा 132.5 अंकांवर होता. सप्टेंबरमध्ये ते 131.3, ऑगस्टमध्ये 130.2 आणि जुलैमध्ये 129.9 होते.

18,000 च्या किमान मूळ पगारावर गणना

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रु. 18,000
नवीन महागाई भत्ता (42%) रु.7560/महिना
आत्तापर्यंतचा महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना
किती महागाई भत्ता वाढला 7560-6840 = रु 720/महिना
वार्षिक पगारात 720X12 = 8640 रुपये वाढ

कमाल मूळ पगाराची गणना रु.56900

कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56900
नवीन महागाई भत्ता (42%) रु 23898/महिना
आतापर्यंत महागाई भत्ता (38%) रुपये 21622/महिना
किती महागाई भत्ता वाढला 23898-21622 = रु 2276/महिना
वार्षिक पगारात वाढ 2276X12 = रु. 27312

महागाई भत्ता वर्षातून दोनवेळा वाढवला जातो

वाढत्या महागाईचा आढावा घेऊन केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून २ वेळा वाढ केली जाते. वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांचे जीवमान सुरळीत राहावे यासाठी वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो.

२०२३ या नवीन वर्षात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अजून एकदाही वाढ केलेली नाही. जर कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली तर कर्मचाऱ्यांचा एकूण DA ४२ टक्के होऊ शकतो.

DA वाढीचा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार फायदा

केंद्र सरकारने DA मध्ये वाढ केली तर सुमारे 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांची यंदाची होळी गोड करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe