OnePlus Smart TV : तुम्ही देखील घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असला तर तुमच्यासाठी OnePlus एक भन्नाट ऑफर घेऊन आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो OnePlus ने मागच्या काही वर्षात स्मार्ट टीव्ही सेंगमेंटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज ग्राहक मोठ्या प्रमाणत OnePlus स्मार्ट टीव्ही खरेदी करत आहे. यातच तुम्ही देखील OnePlus चा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आता तब्बल 14 हजारांची बचत करून नवीन OnePlus चा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनीने 55-इंचाचा OnePlus TV Y1S Pro या स्मार्ट टीव्हीवर भन्नाट डिस्काउंट जाहीर केला आहे. तुम्हाला या डिस्काउंटचा लाभ OnePlus च्या अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. हे जाणून घ्या कि OnePlus TV Y1S Pro कंपनीच्या वेबसाइटवर 49,999 रुपयांसह लिस्टिंग करण्यात आला आहे. मात्र ऑफर अंतर्गत तुम्ही हा स्मार्ट टीव्ही 39,999 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असेल किंवा नेटबँकिंग वापरत असाल तर तुम्हाला आणखी 4,000 रुपयांची सूट मिळेल. या दोन्ही ऑफरसह, फोनवर उपलब्ध एकूण सूट 14,000 रुपये होते.
OnePlus TV Y1S Pro फीचर्स
टीव्हीमध्ये, कंपनी 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 55-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले HDR10+ आणि HDR10 ला सपोर्ट करतो. फोटोचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी कंपनी त्यात गामा इंजिनही देत आहे. OnePlus चा हा TV 2 GB रॅम आणि 8 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
टीव्हीमध्ये आवाजासाठी 24-वॉट स्पीकर सिस्टम आहे. घरबसल्या सिनेमा हॉलची फील मिळण्यासाठी कंपनी या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओलाही सपोर्ट करत आहे. वनप्लसचा हा प्रीमियम टीव्ही बिल्ट-इन गूगल असिस्टेंटने सुसज्ज आहे, जो अलेक्सासोबतही काम करतो. याशिवाय, तुम्हाला बिल्ट-इन Chromecast आणि Miracast देखील मिळेल.
टीव्हीवर ऑफर केलेल्या बिल्ट-इन ऐप्लिकेशन्समध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब आणि हॉटस्टार यांचा समावेश आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर हा TV Android TV 10 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, यात तीन HDMI 2.1, दोन USB पोर्ट आणि OnePlus Connect 2.0 मिळतील. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये ब्लूटूथ 5.0 आणि वाय-फाय 2.4 GHz/5 GHz 802.11 a/b/g/n सारखे पर्याय देण्यात आले आहेत.
हे पण वाचा :- Kyle Gordy : काय सांगता ! ‘हा’ व्यक्ती आहे तब्बल 57 मुलांचा बाप ; आता केला ‘हा’ धक्कादायक खुलासा , जाणून व्हाल थक्क