Bhagat Singh Koshari : तुकडी ढ, इतिहासात 0, भूगोलात 35, कलेत 100 मार्क, कोशारी यांचे मार्कशीट बघितले का?

Ahmednagarlive24 office
Published:

Bhagat Singh Koshari : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे आज पदमुक्त झाले. त्यांची कारकीर्द खूपच वादग्रस्त राहिली. यामुळे अनेकदा राज्यात मोठा वाद निर्माण झाला. आता नवीन राज्यपाल राज्याला मिळाले आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने कोशारी यांना जाता जाता चांगलेच डिवचले आहे.

राष्ट्रवादीने कोश्यारी यांच्याबाबत एक मार्कशीट तयार करत ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप विद्यालयाची ही मार्कशीट असून त्यामध्ये ढ तुकडी असाही उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे यावर अनेकांनी कमेंट केली आहे.

यामध्ये इतिहासाला शुन्य मार्क देत आणि प्रगती न म्हणता अधोगती पुस्तक असे म्हणत टोला लगावला आहे. यामध्ये हजेरी क्रमांक ४२ आहे. याबरोबरच विषयाचे मार्कही देण्यात आलेत. यामध्ये इतिहासात 0 भूगोल ३५, नागरिक शास्त्र १७, सामान्य ज्ञान ३४ कला १०० असे मार्क देण्यात आले आहेत.

यामध्ये विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता बालवाडीपासून सुरुवात करणे योग्य राहील, असे म्हणत राष्ट्रवादीने कोश्यारींना डिवचले आहे. दरम्यान, त्यांना आज निरोप देण्यात आला. भाजप-शिंदे गटाकडून राज्यपालांच्या कामाबाबत कौतुक करण्यात आले.

असे असताना जाता-जाताही कोश्यारींना राष्ट्रवादीने पुन्हा एकदा डिवचले आहे. यामुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा सुरू आहे. हे मार्कशीट राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडवरून शेअर करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe