Maharashtra Political : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
असे असताना यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, यापूर्वी काँग्रेसलाही त्याचे चिन्ह गमवावे लागले होते. हे चिन्ह गेल्यानंतर त्यांनी दुसर चिन्ह घेऊन लोकांत गेले. लोकांनीही ते स्वीकारले. त्यामुळे आजच्या निर्णयाचाही उद्धव ठाकरे यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही. या निर्णयाची काही दिवस चर्चा होईल, असे ते म्हणाले.

शरद पवार यांनी चिन्ह आणि नाव गेल्याचा जास्त परिणाम होत नसल्याचा सांगत उद्धव ठाकरे यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मागेही काँग्रेसचे गाय वासरु चिन्ह होत. ते गेलं आणि पंजा घेतला. त्यामुळे काही फरक पडला नाही, लोकांनी ते स्वीकारलं. आताही फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाची आम्हाला आमचे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी होती. मात्र तसे झाले नाही. त्यांच्या वतीने महेश जेठमलानी यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. तर शिंदे यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली होती.
उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहिर झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.