Shivsena Symbol : ठाकरेंना मोठा दिलासा! नाव गेलं चिन्ह गेलं पण सेना भवन जाणार नाही, कारणही तसेच आहे..

Published on -

Shivsena Symbol : काल निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं आहे. असे असताना आता सेना भवन देखील उद्धव ठाकरे यांच्या हातातून जाणार असे म्हटले असताना त्यांच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

शिवसेना भवन हे जरी शिवसेनेचे मुख्यालय असले तरी त्याची मालकी शिवसेना पक्षाकडे नाही तर ती शिवाई ट्रस्ट कडे आहे. शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते, मीनाताई ठाकरे, पहिले आमदार प्रिन्सिपल वामनराव महाडिक, माधव देशपांडे, सुधीर जोशी, लिलाधर डाके, शाम देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई हे या शिवाई ट्रस्टचे ट्रस्टी होते.

या ट्रस्टी मंडळींनीच मूळ मालक उमरभाई यांच्याकडून शिवसेना भवनसाठी जागा घेतली. त्यामुळे शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टीच्या मालकीचे आहे. यामुळे ठाकरेंसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

सध्या शिवाई ट्रस्टचे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते लीलाधर डाके हे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच शिवसेना भवनाची जागा मिळवण्यापासून ते आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, नेते अरविंद सावंत, रविंद्र मिर्लेकर, विशाखा राऊत हे ही शिवाई ट्रस्टचे ट्रस्टी आहेत, आणि हे सगळे ठाकरे यांच्याकडेच आहेत.

यातील कुणीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत शिवाई ट्रस्टचे ट्रस्टी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, तोपर्यत शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच रहाणार आहे हे स्पष्ट होत आहे. यामुळे ठाकरेंना हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News