दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचीं रक्कम जमा; अजून ‘इतके’ शेतकरी प्रतीक्षेत, उर्वरित लाभार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

50 Hajar Protsahan Anudan : गेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. तत्कालीन सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केवळ कर्जमाफीच केली नाही तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा देखील ठरवलं.

या पार्श्वभूमीवर तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतच प्रोत्साहन राशीं देण्याचा निर्णय घेतला. निश्चितच हा निर्णय कौतुकास्पद होता आणि यामुळेच या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या सरकारच्या कार्यकाळात झालेली नसतानाही वर्तमान सरकारने या योजनेअंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवला.

दरम्यान आता या योजनेसाठी आवश्यक संपूर्ण निधी वितरणास मान्यता राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत 2017-18 2018 19 आणि 2019 20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्ष ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केलेले असेल अशा शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे या योजनेचे स्वरूप आहे. यासाठी वर्तमान सरकारने 4700 कोटी रुपयांची तरतूद केली होती. या अनुषंगाने जानेवारी 2023 पर्यंत एकूण 3700 कोटी रुपये वितरणास मान्यता देण्यात आली होती.

उर्वरित निधीस शासनाकडून मान्यता मिळाली नसल्याने मात्र या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळत नव्हते. परंतु नुकतेच राज्य शासनाने योजनेसाठी उर्वरित 1000 कोटी रुपये निधी वितरणास मान्यता दिली असल्याने या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आता या योजनेबाबत कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी माहिती हाती आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील तीन लाख 577 नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती या योजनेसाठी भरण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पहिल्या यादीत शासनाकडून एक लाख 28 हजार 801 पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली. या यादीमध्ये समावेश असलेल्या शेतकऱ्यांना एक विशेष क्रमांक देण्यात आला आणि आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान या यादीतील आधार प्रमाणीकरण केलेल्या एक लाख 20 हजार 435 शेतकऱ्यांना 440 कोटी 70 लाख रुपयांचे अनुदान शासनाच्या माध्यमातून देऊ करण्यात आले. मध्यंतरी या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५७ हजार पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली, मात्र अनुदान लवकर मिळत नव्हते. राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमुळे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत होता.

मात्र मध्यंतरी दहा हजार ५०६ शेतकऱ्यांचे ३९ कोटी १० लाख रुपयांचे अनुदान आले. आता उर्वरित शेतकऱ्यांपैकी २२ हजार ९५४ शेतकऱ्यांचे ८३ कोटी ८९ लाख रुपयांचे पैसे आले आहेत. दुसऱ्या यादीतील प्रलंबित पात्र शेतकऱ्यांपैकी २२ हजार ९५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८३.८९ कोटी वर्ग झालेले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पहिली यादीमध्ये एकूण एक लाख 28 हजार 801 शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी एक लाख वीस हजार 435 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. 440 कोटी 70 लाख रुपयांचे हे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले असून पहिल्या यादीतील 8366 शेतकरी बांधव अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच दुसऱ्या यादीचा विचार केला असता जिल्ह्यातील 57000 शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीत समावेश होता.

यापैकी 33,460 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. या शेतकऱ्यांना 122 कोटी 99 लाख रुपये अनुदानाचे मिळाले आहेत. जवळपास 3267 दुसऱ्या यादीतील शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.