ऐन लोकसभा निवणूक प्रचारात मराठा आक्रमक ! रावसाहेब दानवेंना घेरलं, भाजप कार्यकर्ते-आंदोलक आमने सामने आल्याने तणाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रात मराठा समाजाने आरक्षण मिळावे यासाठी सर्वतोपरी आंदोलने केली. शासनाने आरक्षण दिलेही पण ते मान्य नसल्याचे सांगत मराठा आंदोलक पुन्हा आंदोलन करण्यास सज्ज झाले.

परंतु आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांना मराठा आंदोलकांना तोंड द्यावे लागत आहे. आता जालना लोकसभेचे महायुतीचे उमदेवार रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी घेरल्याची घटना घडली. त्यामुळे त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

दानवे हे संभाजीनगरमधील पळशी गावात प्रचारासाठी आले होते. त्यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत एकत्रित जमा झाले.

यावेळी भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमने सामने येत घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

जालन्यात तिरंगी लढत
जालना लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसकडून कल्याण काळे उभे आहेत. तर मराठा आरक्षणासाठी स्वत:ची चारचाकी जाळणाऱ्या मंगेश साबळे हे अपक्ष उभे आहेत.

परंतु या निवडणुकीत मनोज जरांगेंच्या नावाचा वापर करायचा नाही त्यांना जरांगे समर्थकांनी सुनावलं असल्याची चर्चा आहे.

जालन्यात मनोज जरांगेंचा प्रभाव कुणाची डोकेदुखी ठरणार
जालना लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव असल्याचे जाणवते. त्यांचा हा वाढता प्रभाव रावसाहेब दानवे यांची डोकेदुखी ठरु शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अनेकदा आंदोलने केली आहेत. या आंदोलनादरम्यान व त्यानंतर जरागेंनी फडणवीसांवर खळबळजनक आरोप देखील केलेले होते. परंतु त्यानंतर

जरांगेंविरोधात एसआयटी स्थापन केली आणि मराठा समाज नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसू शकतो असे म्हटले जात आहे.