आमच्यात आता मतभेद नाहीत, येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रित लढणार ! आ. राम शिंदे आणि ना. विखे पाटील यांचे वक्तव्य

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्जत जामखेडचे माजी आमदार तथा विद्यमान विधानपरिषद आमदार राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातल्या विरोधाची संपूर्ण नगरभर चर्चा पाहायला मिळत होती. विशेष बाब म्हणजे नगर दक्षिणमधून आमदार राम शिंदे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा देखील बोलून दाखवली होती. यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक विखे पाटील यांच्यासाठी मोठी आव्हानात्मक ठरणार असे वाटतं होते.

मात्र सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेऊन मतभेद संपवण्याचा प्रयत्न केला. नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातले अन विखें आणि शिंदे यांच्यातील मतभेद दूर केलेत.

यानंतर शिंदे यांनी सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराला सुरवात केली. सध्या आमदार राम शिंदे हे सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ गुंग झाले आहेत. अशातच डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आमदार राम शिंदे यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आज जामखेड शहरातील चुंभळी येथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली होती. मात्र ही सभा सुरू झाली आणि या सभेच्या सुरुवातीलाच उपस्थित लोकांनी आमदार राम शिंदे यांच्यावर अन्याय होत असल्याचा प्रश्न चव्हाट्यावर आणला.

दरम्यान, उपस्थित लोकांच्या या चर्चेत आमदार राम शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करून मंत्री विखे पाटील आणि माझ्यामध्ये आता कोणतेच मतभेद राहिलेले नसून आपल्याला आता महायुतीच्या उमेदवाराचे काम करायचे आहे, या भागातील शंभर टक्के मतदान हे महायुतीच्या उमेदवारालाच होईल असे काम करायचे आहे, असे म्हणत या चर्चा थांबवल्यात.

आमदार राम शिंदे यांच्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आमच्यात कोणतेच मतभेद नसल्याचे सांगितले. ना. विखे पाटील यांनी, ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या साक्षीने सांगतो की, आमच्या दोघांमध्ये आता कोणतेही मतभेद नाहीत. या पुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रित लढवणार आहोत, याबाबत कुणीही मनात संभ्रम ठेवू नये, असे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe