Ration Card : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमी दरात धान्य वाटप केले जाते. पण कोरोना काळापासून देशातील गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे.
देशाचा नवीन वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ पर्यंत मोफत धान्य वाटप केले जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे देशातील रेशनकार्डधारकांना मोठा फायदा झाला आहे.
दिवसेंदिवस सतत रेशनकार्डच्या नियमांमध्ये बदल केला जात आहे. केंद्र सरकार देशभरातील 80 कोटी गरजूंना मोफत रेशन देत आहे. आता रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण फेब्रुवारी महिन्यात दुप्पट मोफत रेशन मिळणार आहे.
20 फेब्रुवारी 2023 पासून वितरण सुरू होईल
NFSA अंतर्गत गहू-तांदूळ मोफत वाटप यूपीमध्ये 20 फेब्रुवारी पासून सुरू होईल. 28 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण राज्यात मोफत धान्य वाटप सुरू राहणार आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशातील वंचितांना मोफत रेशन मिळणार आहे.
यावेळी रेशन वितरण व्यवस्था पुन्हा रुळावर येईल डिसेंबर 2022 चे रेशन जानेवारी 2023 मिळाले होते. या राज्यातील नागरिकांना २०२२ मार्चपासून याक महिन्याचे रेशन उशिरा मिळत आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये दुप्पट रेशन देऊन रेशन वाटपाची व्यवस्था सुरळीत करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे रेशन नागरिकांना एकाच वेळी मिळणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून नागरिकांना पुन्हा दरमहा रेशन मिळणार आहे. आता इथून पुढे रेशन वाटपमध्ये कोणताही विलंब होणार नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे.