7th Pay Commission : जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर लवकरच सरकार तुम्हाला गोड बातमी देणार आहे. यामुळे सुमारे 62 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
होळीपूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढू शकतो.
जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता लागू
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून वाढीव भत्ता दिला जाईल. म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकी दिली जाणार आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते.
डिसेंबरमध्ये AICPI निर्देशांक 132.3 अंकांवर खाली आला आहे. सरकारकडून महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केल्यावर 18000 रुपयांच्या मूळ पगारावर 7560 रुपये महागाई भत्ता मिळेल.
वर्षाला 9 हजार रुपयांची वाढ होणार
दरम्यान, आत्ताच्या 38 टक्क्यांनुसार हा महागाई भत्ता 6840 रुपये होतो. वार्षिक बोलायचे तर ही वाढ सुमारे 9,000 रु. त्याचप्रमाणे, जर आपण 56,900 रुपयांच्या कमाल मूळ वेतनावरील डीए वाढीचा आकडा पाहिला, तर तो प्रति महिना 2276 रुपये (वर्षाला 27,312 रुपये) आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 21622 रुपये दरमहा महागाई भत्ता मिळतो, तो वाढून 23898 रुपये होणार आहे.
संपूर्ण गणित समजून घ्या
सध्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपये आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल केल्यानंतर ते 26,000 रुपये होईल. सध्या, फिटमेंट फॅक्टरच्या 2.57 पट आणि मूळ वेतन 18000 रुपये, इतर भत्ते वगळून, रु. 18,000 X 2.57 = रु. 46260. परंतु जर ते 3.68 पर्यंत वाढवले तर इतर भत्ते वगळून कर्मचाऱ्यांचे वेतन 26000 X 3.68 = 95680 रुपये होईल.