Uddhav Thackeray : 16 आमदार अपात्र व्हायलाच पाहिजेत! उद्धव ठाकरे यांनी सांगितले यामागचे कारण..

Published on -

Uddhav Thackeray : सध्या राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना गेल्याने सध्या ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद निर्माण झाला आहे. असे असताना उद्धव ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी घटनातज्ज्ञांचा सल्ला घेतलाय, 16 आमदार अपात्र व्हायलाच पाहिजेत, निवडणूक आयोगाचा निकाल आयोग्य आहे. घटनाक्रम जो घडला आहे. त्यानुसार निकाल अपेक्षित आहे.

तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी उद्यापासून सुरू आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांनी निकाल देऊ नये अशी मागणी होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. दोन तृतियांश एका संख्येने गेले नाही. आधी 16 गेले. त्यांची केस सुरू आहे. त्यानंतर 23 जणांच्या अपात्रतेची केस सुरू आहे, असेही ठाकरे म्हणाले.

तसेच टोटल मारली तरी दोन तृतियांशांना कोणत्या तरी पक्षात विसर्जित झाले पाहिजे. असे घटनेत म्हटले. त्या आधी आयोगाने घाई करण्याची गरज काय होती? असेही ठाकरे म्हणाले. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह जरी चोरले असल तरी हा पूर्वनियोजित कट होता, असा खळबळजनक दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी शिवसेना नाव चोरले तरी ठाकरे हे नाव नाही चोरू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe