IPhone 13 Pro Max : भारतातील तरुणांमध्ये आयफोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र आयफोनची किंमत जास्त असल्याने अनेक तरुणांना आयफोन खरेदी करता येत नाही. पण आता अनेकांचे आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
आयफोन 13 प्रो मॅक्स फोनवर मोठी ऑफर दिली जात आहे. आता ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाइट वर स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर दिल्या जात आहेत. यामध्ये स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते.
अशीच एक ऑफर लागली आहे. ज्यामध्ये आयफोन 13 प्रो मॅक्स फक्त 10 हजारांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हीही आयफोन खरेदीसाठी या ऑफरचा लाभ घेतला तर तुमच्या पैशाची मोठी बचत होऊ शकते.
आयफोन 13 प्रो मॅक्स बाजारात इतका स्वस्त का मिळत आहे?
आयफोनच्या किमती पाहायला गेले तर त्या इतर स्मार्टफोन्सपेक्षा अधिक आहेत. पण सध्या आयफोन 13 प्रो मॅक्स 10 हजारांमध्ये मिळत आहे. पण हा फोन इतका स्वस्त का मिळत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
आयफोन 13 प्रो मॅक्स हे प्रत्यक्षात डुप्लिकेट मॉडेल आहे, जे आयफोनसारखे डिझाइन केलेले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही हा फोन खरेदी करायला गेलात तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
हा स्मार्टफोन अगदी आयफोन सारखा डिझाईन केलेला आहे. तसेच फीचर्स Android सारखे दिलेले आहेत. त्यामुळे बाहेरून पाहिल्यास तुम्हाला हा फोन सेम आयफोन सारखा दिसेल.
हा फोन बाहेरून पाहिल्यास त्यात तीन कॅमेरे दिसत असले तरी आतमध्ये स्वस्त कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याची चित्र गुणवत्ता अतिशय निरुपयोगी आहे. त्यामुळे यावर मोठी ऑफर दिली जात आहे.
जर तुम्ही आयफोन खरेदी करत असाल तर सावधानता बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचीही फसवणूक केली जाऊ शकते. तसेच तुम्ही आयफोन घेण्याचे स्वप्न पहिले असेल आणि हा फोन खरेदी केला तर तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.