Poco C55 : भारतात पोकोने लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत आहे…

Published on -

Poco C55 : भारतीय बाजारात पोकोच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीही ग्राहकांच्या मागणी आणि गरज लक्षात घेऊन नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच कंपनीने आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.

कंपनीच्या आगामी फोनच्या मॉडेलचे नाव Poco C55 हे आहे. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन आहे. कंपनीने यात 10W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी तसेच एक मोठा HD प्लस डिस्प्ले कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

Poco च्या आगामी फोनची इतकी असणार किंमत

Poco च्या आगामी फोनची किंमत 9,499 रुपये इतकी आहे. यात कंपनीने 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज उपलब्ध करून दिले आहे, तर 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 10,999 रुपये इतकी आहे. हा फोन कूल ब्लू, फॉरेस्ट ग्रीन आणि पॉवर ब्लॅक कलरमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

या फोनची विक्री 28 फेब्रुवारीपासून होणार असून बँक ऑफरसह, 8,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत फोन खरेदी करण्याची संधी असणार आहे. तर टॉप व्हेरिएंट 9,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे.

काय असणार स्पेसिफिकेशन

कंपनीच्या या फोनमध्ये MIUI 13 आहे. तसेच, यात MediaTek Helio G85 प्रोसेसरसह 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज असेल. फोनमध्ये 6.71-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याची ब्राइटनेस 534 nits आहे आणि रीफ्रेश दर 60Hz आहे.

कसा असणार कॅमेरा

कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर यात दोन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे, ज्यात ऍपर्चर f/1.8 आहे. तसेच कंपनीने दुसऱ्या लेन्सबाबत माहिती दिलेली नाही. समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा दिला असून नाईटसह अनेक मोड कॅमेरासोबत उपलब्ध असणार आहे.

असणार 5000mAh बॅटरी

Poco च्या या फोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. तसेच फोनमध्ये वाय-फाय, 4जी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि मायक्रो यूएसबी पोर्ट आहे. फोनमध्ये 10W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी असून फोनला वॉटर रेझिस्टन्ससाठी IP52 रेटिंग मिळाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News